• A
  • A
  • A
पन्हाळा तालुक्यातल्या यशवंत बँकेतील दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश

कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातल्या यशवंत बँकेतील दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तपासादरम्यान उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. चाँद खान आणि गुड्डू खान अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून उर्वरित ६ जणांचा शोध सुरू आहे.


अटक करण्यात आलेल्या आरोपींच्याकडून ट्रक, गॅस कटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी दिल्ली आणि उत्तरप्रदेश पोलिसांची मदत घेणार असल्याची पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी माहीती दिली आहे.

पन्हाळा तालुक्यातील कळे येथे ८ फेब्रुवारीला अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने यशवंत सहकारी बँकेवर मध्यरात्री दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी गॅस कटरच्या मदतीने लॉकर तोडून रोख रक्‍कम आणि सोन्‍याचे दागिने असा सुमारे १ कोटी रुपयांचा ऐवज लुटला होता. यामध्ये तारण ठेवलेल्‍या सोन्याच्या दागिन्यांवर सुद्धा डल्‍ला मारला होता. चोरीची घटना झाल्याचे समजताच पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली होती. पण त्यातूनही हे दरोडेखोर निसटून जाण्यात यशस्वी झाले होते. तेंव्हापासून कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मुंबईतील ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, अंधेरी, मरोळ या ठिकाणी तपास केला. तपासादरम्यान पोलिसांना उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील दोन गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी यशवंत बँकेच्या दरोड्याची कबुली दिली. शिवाय यामध्ये आणखीन ६ जण सोबत असल्याचीही त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरोड्याचा छडा लावल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES