• A
  • A
  • A
कोल्हापुरात भिंत कोसळली; ६ जण जखमी तर २ गंभीर

कोल्हापूर - शहरातील भेंडे गल्लीत एका इमारतीच्या बांधकामासाठी पाया खोदत असताना शेजारच्या इमारतीची भिंत कोसळली. यामध्ये अनेक कामगार ढिगाऱ्याखाली दबले. यात ६ जण जखमी झाले असून दोन जण गंभीर आहेत. हे सर्व सेंट्रींगचे कामगार आहेत. अशी माहिती अग्निशामन दलाने दिली आहे.


येथील भेंडे गल्लीत ही दुर्घटना घडली आहे. जखमींना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे. कोल्हापुरातील भेंडे गल्ली परिसरात विजयसिंह दादासो पाटील यांच्या घरा शेजारी एका नवीन इमारतीचे काम सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या इमारतीचा पाया खोदण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना आज अचानक शेजारीच असलेल्या पाटील यांच्या जुन्या घराची भिंत कोसळली. कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्यात शेजारच्या इमारतीच्या कामासाठी आलेले सहा कामगार दबले. यामध्ये २ सेट्रींगचे कामगार गंभीररीत्या जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामनचे जवान घटनास्थळी दाखल होऊन अडकलेल्या मजुरांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले. त्यांनतर त्यांना उपचारासाठी तत्काळ छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कामगारांना वेळेत बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES