• A
  • A
  • A
पुणतांब्यांतील मुलींचे उपोषण दडपणे निषेधार्ह - राजू शेट्टी

कोल्हापूर - पुणतांब्यांच्या शेतकाऱ्यांच्या मुलींना उपोषणाला बसण्याची वेळ येणे ही राज्यकर्त्यांसाठी शरमेची बाब असल्याचे खासदार राजू शेट्टी म्हणाले. दडपशाही करून त्यांच्या उपोषण स्थळावरील तंबू मोडणे हे निषेधार्ह असल्याचेही सांगितले. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.


हेही वाचा - कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला अंधश्रद्धेचे गालबोट; जिंकण्यासाठी खेळाडूने सॉक्समध्ये घातले लिंबू
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्यावर्षी देशभर गाजलेल्या शेतकरी संपाची सुरुवात पुणतांबा येथून झाली होती. त्यानंतर सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे गेल्या ४ फेब्रुवारीपासून पुणतांबा येथे निकिता धनंजय जाधव, पूनम राजेंद्र जाधव, शुभांगी संजय जाधव या शेतकऱ्यांच्या मुलींनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. हे आंदोलन शासनाने मोडीत काढले हे योग्य नसल्याचे खासदार शेट्टी यांनी म्हणाले.

हेही वाचा - कोल्हापुरात २ सराफी दुकानात चोरी, १० किलो चांदीच्या दागिन्यांसह ६० तोळे सोन्याचे दागिने लंपास
डिजिटल इंडियाची भाषा करणाऱ्या पंतप्रधान, कृषिमंत्री, मुख्यमंत्री यांनी त्यांच्याशी निदान व्हिडिओ कॉन्फरसनद्वारे संवाद साधण्याची गरज होती, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांचे उपोषण मोडून काढणे हे चुकीचे आहे. या सरकारला या शेतकऱ्यांच्या उपाशी मुलींचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही मार्गाने जर सर्व सुरू असेल तर अशा प्रकारची दडपशाही कशासाठी? अशी दडपशाही करणे योग्य नसल्याचे देखील शेट्टी म्हणाले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES