• A
  • A
  • A
यशवंत बँकेवर दरोडा; दागिन्यांसह रोकड रक्कम पळवली

कोल्हापूर - जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील कळे गावाच्या यशवंत सहकारी बँकेवर अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री दरोडा टाकला. बँकेत चोरांनी गॅस कटरच्या मदतीने लॉकर तोडून रोख रक्‍कम आणि सोन्‍याचे दागिने असा मोठा ऐवज लुटला आहे. आज सकाळी ही चोरीची घटना उघडकीस आली.हेही वाचा - कोल्हापुरात २ सराफी दुकानात चोरी, १० किलो चांदीच्या दागिन्यांसह ६० तोळे सोन्याचे दागिने लंपास
कोल्हापुरातील गुजरीत झालेल्या चोरीच्या घटनेनंतर अवघ्या काही तासांत चोरट्यांनी पुन्हा धुमाकुळ घातला आहे. कोल्हापूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या कळे येथील बँकेवर दरोडा टाकला आहे. या सलग दोन घटनेमुळे मात्र, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याचोरीमध्ये चोरांनी मोठी रक्‍कम आणि तारण ठेवलेल्‍या सोन्याच्या दागिने पळवले आहे. चोरीच्या या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा - कोल्हापुरातून लाचखोर अधिकाऱ्याला अटक, बटालियन जवानाकडून मागितली लाच
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून ठसेतज्ञ आणि श्वान पथकाच्या मदतीने या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. बँकेतून अद्याप किती रोख रक्कम आणि किती सोन्याचे दाग दागिने चोरीला गेले आहेत. याची पडताळणी बँकेचे वरिष्ठ अधिकारी करत असून अद्याप बँकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची फिर्याद दिलेली नाही.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES