• A
  • A
  • A
कोल्हापुरात २ सराफी दुकानात चोरी, १० किलो चांदीच्या दागिन्यांसह ६० तोळे सोन्याचे दागिने लंपास

कोल्हापूर - कोल्हापुरातील सराफांची गल्ली म्हणून ओळखली जाणाऱ्या गुजरीमध्ये चोरट्यांनी आज पहाटेच्या सुमारास २ दुकानावर डल्ला मारला. गुजरी परिसरात ५ चोरांच्या टोळक्याने ३ दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. त्यातील २ दुकानांमध्ये चोरी करण्यात हे चोरटे यशस्वी झाले आहेत. ही चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून यामध्ये सुमारे २२ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती दुकान मालकांनी दिली.


हेही वाचा-प्रक्षोभक वक्तव्य केल्यास ओवेसींना परत जाऊ देणार नाही - सकल मराठा समाज
महाद्वार रोड परिसरातील गुजरीमध्ये अनेक सोन्या चांदीची होलसेल व किरकोळ दुकाने आहेत. त्यापैकी महाद्वार परिसरातील प्रमोद कल्लाप्पा कोलेकर यांच्या दुकानातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह दोन बाय अडीचच्या आकाराची तिजोरीच चोरांनी उचलून नेली आहे. विशेष म्हणजे तिजोरीला सायरन असतानाही चोरट्यांनी ही तिजोरी लांबवली आहे. तर गुजरीजवळील गुरुवार पेठेतील संतोष दिनकरराव शेळके यांच्या सराफी दुकानातूनही या चोरट्यांनी रोख रक्कमेसह ५ लाखांचा सोन्याचांदीचा ऐवज लंपास केला आहे. या चोरट्यांनी एका अवजड हत्याराने कुलुपच्या पट्ट्या तोडून दुकानांमध्ये प्रवेश केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष शेळके यांचे कर्मचारी नेहमी प्रमाणे त्यांचे ज्वेलरीचे दुकान उघडायला गेले असता त्यांना दुकानाच्या दोन्ही कुलूपाच्या पट्ट्या कापलेल्या दिसल्या. त्यानंतर त्यांनी लगेचच मालकाला फोन करून सदर घटनेची माहिती दिली. मालक शेळके तत्काळ दुकानात आले आणि चोरीबाबतची माहिती येथील जुना राजवाडा पोलिसांना दिली. चोरीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दुकानात असणारे सीसीटीव्ही तपासले असता त्यांना त्यामध्ये एक चोरटा जॅकेट घालून आणि तोंडाला रुमाल बांधून दुकानात घुसलेला दिसून आला.

हेही वाचा-कोल्हापुरातून लाचखोर अधिकाऱ्याला अटक, बटालियन जवानाकडून मागितली लाच
पहाटे ४ च्या सुमारास या चोरटे दुकानात घुसून सोन्या चांदीचे दागिने एका बादलीमधून घेऊन गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. यामध्ये दुकानातील साडेचार किलो चांदी तर सोन्याचे ७० ते ८० ग्रॅम दागिने इतका मुद्देमाल घेऊन चोर पसार झाले.

अंबाबाई मंदिरापासून जवळच असलेल्या अमोल कोलेकर यांच्या कोलेकर ज्वेलर्समध्ये सुद्धा अशाच पद्धतीने चोरी झाली आहे. यांच्या दुकानातील ४ ते ५ किलो चांदी आणि ५०० ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन गेलेच परंतु महत्वाची बाब म्हणजे चोर त्यासोबाबत दोन बाय अडीच एव्हडी तिजोरीच उचलून घेऊन गेले आहेत. चोरीची घटना समजताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान पोलिसांनी वेगवेगळी ५ तपास पथके तैनात केली असून ते चोरांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा-'रिक्षा स्क्रॅप ऑर्डर' रद्दच्या मागणीसाठी मनसे रिक्षा संघटनेचा परिवहन कार्यालयावर मोर्चा


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES