• A
  • A
  • A
प्रक्षोभक वक्तव्य केल्यास ओवेसींना परत जाऊ देणार नाही - सकल मराठा समाज

कोल्हापूर - वंचित बहुजन विकास आघाडीच्या मेळाव्याचे १२ फेब्रुवारीला कोल्हापूर शहरात आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्यासाठी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी येणार आहेत. ओवेसींच्या येण्याला कोल्हापूरमधल्या सकल मराठा समाजाने विरोध केला आहे. मराठा समाजाविरोधात जर ओवेसी यांनी प्रक्षोभक वक्तव्य केले तर त्यांना परत जाऊ दिले जाणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.


हेही वाचा - स्पेशल रिपोर्ट: तेलंगणा निवडणुकीत ओवैसी यशाचे 'चारमिनार' रचणार का ?
मराठा समाज मोठा भाऊ नाही, असे वक्तव्य ओवेसींनी केले होते त्यामुळे त्यांच्याविरोधात कोल्हापूरमध्ये विरोधाची भूमिका घेण्यात येत आहे. कोल्हापूरमधल्या दसरा चौकात येत्या १२ तारखेला प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची संयुक्त सभा होणार आहे.
हेही वाचा - ओवेसींच्या आवाहनानंतर काँग्रेसच्या हालचाली वाढल्या,आंबेडकरांसोबत...
विशेष म्हणजे गेल्या वर्षीही नगरपालिका निवडणुकांवेळी एमआयएमची सभा कोल्हापूर मध्ये होणार होती, त्यावेळीही सभेला आणि उमेदवार देण्याला कोल्हापूरकरांनी विरोध केला होता. कोल्हापूर शहर पुरोगामी असून येथे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे आवाहनही त्यावेळी करण्यात आले होत, त्यामुळे यावेळीही कोल्हापूरमध्ये ओवेसी येणार की नाही याबाबत साशंकता आहे.
हेही वाचा - जय भिम-जय मिम : भारिप-एमआयएम युतीचा संभाव्य धोका कुणाला?

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES