• A
  • A
  • A
कोल्हापुरातून लाचखोर अधिकाऱ्याला अटक, बटालियन जवानाकडून मागितली लाच

कोल्हापूर - लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आयआरबीच्या समादेशकाला कोल्हापूरमध्ये अटक केली आहे. खुशाल विठ्ठल सपकाळे असे या अधिकाऱ्याचे नाव असून, दीड महिन्यापूर्वीच तो सेवानिवृत्त झाला होता. राखीव बटालियनच्या जवानाकडे लाच मागितल्याचा त्याच्यावर आरोप आहे.


जुलै २०१८ मध्ये कोल्हापूर येथील राखीव बटालियन नंबर ३ च्या कार्यालयात बटालियन जवानांकडे लाचेची मागणी झाल्यासंबंधी एक तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार, येथील कार्यालयात एसीबीने सापळा रचला होता. यावेळी ४० हजारांची लाच घेताना पोलीस उपअधीक्षकासह पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदार, कॉन्स्टेबल आणि क्लार्क, अशा सहा जणांना रंगेहात पकडले होते. या सर्वांना अटक केल्यानंतर झालेल्या तपासात पुराव्यांच्या आधारे एसपी खुशाल सपकाळे याचा सुद्धा या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.

हेही वाचा - बनावट विदेशी नोटाचे आमिष दाखवून फसवणूक करणारा केनियन आरोपी जेरबंद

सपकाळे याचे व्हॉट्सअप चॅटिंग तपासल्यानंतर त्याच्याविरोधात पुरावा आढळून आला. सपकाळेचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यापासून कोल्हापूर एसीबीने त्यांना तपासासाठी हजर होण्याबाबत सूचना केल्या होत्या. पण वारंवार सूचना देऊनही सपकाळे हजर झाला नसल्याने, काल त्याला मुंबई येथून अटक करण्यात आली.

हेही वाचा - 'रिक्षा स्क्रॅप ऑर्डर' रद्दच्या मागणीसाठी मनसे रिक्षा संघटनेचा परिवहन कार्यालयावर मोर्चा
कोल्हापूर एसीबीची आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून आतापर्यंत सात जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापूर्वी सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये सहाय्यक समादेशक मनोहर नारायण गवळी, पोलीस निरीक्षक मधु श्रीपद सकट, साहाय्यक फौजदार आनंद महादेव पाटील, सहाय्यक फौजदार रमेश भरमु शिरगुप्पे, लिपिक राजकुमार जाधव, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कोळी यांचा समावेश असून त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES