• A
  • A
  • A
'रिक्षा स्क्रॅप ऑर्डर' रद्दच्या मागणीसाठी मनसे रिक्षा संघटनेचा परिवहन कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर - राज्य सरकारने अनेक शहरांमध्ये १६ वर्षांहून जुन्या झालेल्या रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याला रिक्षाचालकांनी तीव्र विरोध केला आहे. कोल्हापूरमध्ये आज मनसेच रिक्षा संघटनेच्या वतीने परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो रिक्षाचालक रिक्षांसह सहभागी झाले होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


हेही वाचा -बनावट विदेशी नोटाचे आमिष दाखवून फसवणूक करणारा केनियन आरोपी जेरबंद
इतर वाहनांचाही कालावधी संपलेला असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही आणि फक्त रिक्षाचालकांवर कारवाई का केली जाते? असा सवाल मोर्चावेळी विचारण्यात आला. याविषयी निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी कोल्हापूर परिवहन कार्यालय परिसरात शेकडो रिक्षा मोर्चाच्या स्वरुपात एकत्र आल्याने या भागातील वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. दरम्यान राज्यातील एसटी विभागांमधील अनेक एसटी गाड्याही कालावधी संपलेल्या आहेत, मग त्या वाहनांवरही कारवाई का केली जात नाही असाही प्रश्न रिक्षाचालकांनी विचारला.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES