• A
  • A
  • A
बनावट विदेशी नोटाचे आमिष दाखवून फसवणूक करणारा केनियन आरोपी जेरबंद

कोल्हापूर - बनावट युरो आणि अमेरिकन डॉलरच्या नोटा बनवून देतो, असे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या केनियातील आरोपी मुथाय इसाह (वय ४५) याला कोल्हापुरात अटक केली आहे. स्थायिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. यावेळी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अमेरिकन डॉलर्स आणि परकीय चलन जप्त केले आहे.


हेही वाचा - उडाणच्या तिसऱ्या टप्प्यात विमान पाण्यावर उतरणार; २३५ ठिकाणी मिळणार सेवा
इचलकरंजी मधील एका बांधकाम व्यावसायिकास भागिदारी आणि त्याच्या व्यवसायात मोठ्या रकमेची गुंतवणूक करतो, असा बहाणा करून त्याच्याशी संपर्क साधत होता. परंतु, फिर्यादीने इचलकरंजी मधील शिवाजीनगर इथल्या पोलीस ठाण्यात आरोपी मुथाय इसाह याच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाने त्याचा शोध सुरू केला. आरोपी हा कोल्हापूरमधील कोहिनूर हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती मिळताच, स्थायिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने हॉटेल कोहीनूरवर छापा टाकला. यावेळी त्याच्याकडे बनावट नोटा आणि बनावट नोटा बनवायचे साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. त्या साहित्यासोबत त्याला हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले.

आरोपीची चौकशी केली असता, तो बनावट नोटा बनवण्याचे रॅकेट चालवत असल्याचे आढळून आले. ज्यावेळी तो लोकांना भेटायचा त्यावेळी आपल्याकडे स्वीस बँकेकडे असणाऱ्या काळ्या रंगाचे कागदी डॉलर अदृश्य स्वरूपात मोठ्या प्रमाणात आहेत, ते पैसे मी घेऊन आलो आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय पातळीवर ते चलन सुरक्षित राहावे, असे सांगून ते चलन काळे करून देत असे. ज्यावेळी हा आरोपी भेटायला जात होता, त्यावेळी त्याच्यासोबत पांढऱ्या रंगाची लॉकर घेऊन जात असे. त्यामध्ये काळ्या कागदाचे बंडल होते. तो बनावट कागदी नोटा दाखवून त्याच्याजवळ असणाऱ्या लॉकरमधील काळे कागद काढून हातचलाकीने केमिकलमध्ये धुवून त्यामधून तो परकीय ५०० युरोज हे चलन दाखवून भारतीय चलनात रूपांतरित करत होता.

हेही वाचा - वैभववाडी रेल्वेमार्ग निश्चितपणे पूर्णत्वास नेऊ - सुरेश प्रभू


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES