• A
  • A
  • A
उडाणच्या तिसऱ्या टप्प्यात विमान पाण्यावर उतरणार; २३५ ठिकाणी मिळणार सेवा

कोल्हापूर - देशातील बहुचर्चित उडाण उपक्रमांतर्गत पहिल्या २ टप्प्यांमध्ये सुरू झालेली विमानसेवा यशस्वी झाली आहे. आता तिसऱ्या टप्प्यात २३५ ठिकाणी विमानसेवा सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या योजनेमध्ये पाण्यात उतरणाऱ्या विमानांचाही समावेश असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कोल्हापूरमधील विमानतळाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.


हेही वाचा - कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडींग सुविधेसह कार्गो हब विकसित करू -...
प्रभू म्हणाले, उडाण योजना सुरू झाल्यापासून ती देशाच्या बाहेरही सुरू व्हावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे छोट्या शहरांमधून आणि राज्यांमधून ही सेवा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
कोल्हापूरची विमानसेवा गेल्या ६ वर्षांपासून बंद होती. मात्र, उडाण योजनेअंतर्गत बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांशी कोल्हापूरदेखील विमानसेवेने जोडले आहे. शिवाय कोल्हापूर विमानतळावरून मुंबईसाठीही लवकरच सेवा देण्यात येणार असून नाईट लँडिंगची सोयही लवकरच होईल, असेही प्रभू यांनी सांगितले. या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्यातील तिन्ही खासदार म्हणजेच धनंजय महाडिक, राजू शेट्टी आणि संभाजी राजे छत्रपती हे उपस्थित होते.
हे ही वाचा - नवी मुंबई विमानतळाच्या कामात भ्रष्टाचार; विखे पाटलांचा गौप्यस्फोट

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES