• A
  • A
  • A
कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडींग सुविधेसह कार्गो हब विकसित करू - सुरेश प्रभू

कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळावर लवकरच नाईट लँडींग सुविधेसह कार्गो हब निर्माण केले जाईल, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवार २ फेब्रुवारी येथे केली. कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनल इमारत आणि एटीसी टॉवरचे रिमोट कंट्रोलद्वारे भूमीपूजन प्रभू यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.


हेही वाचा - अर्थसंकल्पात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास - हसन मुश्रीफ
यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, धनंजय महाडिक, संजय पाटील, आमदार अमल महाडिक, महापौर सरिता मोरे, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील आदी उपस्थित होते.
कोल्हापूर विमानतळ ७५० एकरावर विकसित होत आहे. शेजारीच कार्बोहब विकसित करून येथील उद्योजकांची, शेतकऱ्यांची व अन्य घटकांची निश्चितपणे सोय होऊन कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केले. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणानंतर येथे मोठी विमाने उतरतीलच तसेच जागतिक स्तरावरील सर्व सुविधा या विमानतळावर उपलब्ध करून देऊ. छत्रपती राजाराम महाराजांनी सुरु केलेल्या विमानतळाचा निश्चितपणे लौकीक वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - कागलमध्ये ४ हजार मुलांकडून स्वच्छता; शेकडो टन कचरा जमा
कोल्हापूरचे विमानतळ पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचे प्रमुख केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करून नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, केंद्र शासनाने देशात विमानसेवेला प्राधान्य दिले असून भारताने विमान सेवेमध्ये जगात गौरव निर्माण केला आहे. देशात १०१ विमानतळ असून त्यांचा विकास करण्यास प्राधान्य दिले आहे. आज विमाने पाण्यावर उतरण्याची नवी योजनाही आखली आहे. उड्डाण योजनेंर्गत सर्वसामान्य मानसासाठी हवाईसेवा उपलबध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. उड्डाण-३ अंतर्गत २३५ ठिकाणी विमानसेवा सुरू होईल. आता देशांतर्गत सेवेबरोबरच राज्यातूनही आंतरराष्ट्रीय सेवाही सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या विमानसेवेसाठी राज्य शासनामार्फत आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल. राज्यात रस्ते, रेल्वे, विमानसेवा, जलसेवेद्वारे दळणवळणाच्या नवनव्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. कोल्हापूरच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने ३० टक्क्याचा हिस्सा म्हणून ८४ कोटी रूपयाचा निधी दिला असल्याचे ते म्हणाले. कोल्हापूर विमानतळावर पार्कींग हब आणि कार्गो हब सुरू व्हावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात विमानसेवा सुरू करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - अंबाबाई मंदिर किरणोत्सव : तिसऱ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या हातापर्यंत

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES