• A
  • A
  • A
अर्थसंकल्पात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास - हसन मुश्रीफ

कोल्हापूर - केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. भिकाऱ्यांना लाजवेल अशी मदत केंद्र सरकारने दिली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे. कागल येथील एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.


अर्थसंकल्पामध्ये साखर किंवा ऊसाच्या दराबाबत कुठलाही उल्लेख करण्यात आला नाही. साखरेचा हमी भाव वाढवला असता तर एफआरपी देणे शक्य झाले असते. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालावे, असे त्यांनी म्हटले आहे. कारखानदारांनी एफआरपी देण शक्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता कारखाने बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये राष्ट्रीय तंबाखूमुक्त निवारण कार्यक्रमाचे आयोजन
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना एकरकमी एफआरपीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे साखर आयुक्तांनी सुद्धा एफआरपी मुद्द्यावर कडक भूमिका घेतली आहे. अद्याप एफआरपी दिली नसलेल्या कारखान्यांचा ताळेबंद तपासून स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करणार असल्याची नोटीस साखर आयुक्तांनी काढल्या आहेत. त्यामुळे एफआरपीचा मुद्दा अजूनच गाजनार असल्याची शक्यता आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES