• A
  • A
  • A
कागलमध्ये ४ हजार मुलांकडून स्वच्छता; शेकडो टन कचरा जमा

कोल्हापूर - एखाद्या गावाने मिळून ठरवले तर काहीच अशक्य नाही. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करण्याची ताकद एकतेमध्ये निर्माण होते. त्याचेच प्रत्यंतर आज कोल्हापूर जिल्ह्यामधील कागलमध्ये आले. कागलमध्ये सुमारे ४ हजार विद्यार्थी, ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनेच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


हेही वाचा - अंबाबाई मंदिर किरणोत्सव : तिसऱ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या हातापर्यंत
यामध्ये विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत संपूर्ण कागल काही तासांमध्ये चकाचक झाले. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ स्वतः या महास्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. कागल नगरपरिषद आणि प्रशासनाच्यावतीने कागलमध्ये आज महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. कागल शहरातील जवळपास १४ ठिकाण निवडून त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.

महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने या महास्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होते. कागलमधील अनेक नाले, रस्ते, गटारी साफ करण्यात आले आणि शेकडो टन कचरा कागल शहरामधून जमा करण्यात आला. गाव करील ते राव काय करील या ग्रामीण भागातील प्रचलित म्हणीचे प्रत्यंतर या मोहिमेच्या माध्यमातून कागलमध्ये आले.
हेही वाचा - समाजातील सर्वच घटकांना विकासाच्या प्रक्रियेत आणणारा अर्थसंकल्प - चंद्रकांत पाटील


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES