• A
  • A
  • A
अंबाबाई मंदिर किरणोत्सव : तिसऱ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या हातापर्यंत

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या किरणोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी अंबाबाई मातेच्या हातातील फळ माळुंब्रापर्यंत सूर्याची किरणे गेली आहेत. यानंतर मात्र सूर्याची किरणे लुप्त झाली. तिसऱ्या दिवशीही भाविकांनी किरणोत्सव पाहण्यासाठी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.


हेही वाचा- सूर्यकिरणे अंबाबाईच्या चरणांना स्पर्श करून लुप्त, भाविकांची गर्दी
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा किरणो उत्सवाला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. किरणोत्सवाच्या आज तिसऱ्या दिवशी सायंकाळच्या मावळत्या सूर्यकिरणांनी अंबाबाईच्या हाताला हलकासा स्पर्श केला. यानंतर किरणे लुप्त झाली. सायंकाळी ६ वाजून १३ मिनिटांनी अंबाबाईच्या गाभार्‍यातील मूळ मूर्तीला हा स्पर्श झाला. आजही ढगाळ वातावरण असल्याने किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होऊ शकला नाही.
हेही वाचा - समाजातील सर्वच घटकांना विकासाच्या प्रक्रियेत आणणारा अर्थसंकल्प - चंद्रकांत पाटील
अंबाबाई मंदिरात प्रत्येक वर्षातील नोव्हेंबर आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात असे २ वेळा किरणोत्सव सोहळा पार पडतो. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. किरणोत्सवादरम्यान मंदिर १ तास बंद ठेवण्यात येते. भाविकांची गैरसोय होऊ नये आणि किरणोत्सव पाहता यावा यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे २ ठिकाणी मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. याच्या माध्यमातून भाविकांनी या किरणोत्सव सोहळ्याचा आनंद घेतला.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES