• A
  • A
  • A
समाजातील सर्वच घटकांना विकासाच्या प्रक्रियेत आणणारा अर्थसंकल्प - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - हा अर्थसंकल्प शोषित, वंचित, कष्टकरी कामगार, शेतकरी, मध्यवर्गीय, तरूण व जेष्ठ नागरिकांसह समाजातील सर्व वर्गांचा सर्वसमावेशक विकास साधणारा आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणारा आहे. यामध्ये विकासाचे प्रतिबिंब दिसत आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. लोकांच्या कल्याणाचा आणि लोकांच्या हिताचाच यामध्ये समावेश असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसुल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.


राज्याचे महसुल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने नेहमीच सर्वांसोबत सर्वांचा विकास हेच धोरण ठेऊन काम केले आहे. आज सादर झालेला अर्थसंकल्प हा सर्व समाज घटकांबरोबर घेऊन जाणारा व सर्वांचा विकास साधणारा आहे. सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवत महागाई कमी केली. भारतात परदेशी गुंतवणूक वाढली. एनपीए कमी करण्यासाठी प्रयत्न केला. जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली. भ्रष्टाचार रोखण्यासाठी जरब बसेल, असे कायदे केले. बेनामी कारभार थांबवण्यासाठी रेरा कायदा आला.
हेही वाचा - अंतरिम अर्थसंकल्पामध्ये आमच्या हाती पुन्हा भोपळाच, कोल्हापुरातील शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
आर्थिक फसवणूक करून पळून जाणाऱ्यांसाठी कडक कायदा अंमलात आणला आणि त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली. २ हेक्‍टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी थेट ६ हजार जमा होणार आहे. पशुसंवर्धन, मत्स्यपालनासाठी शेतकरी क्रेडिट कार्ड, कर्जामध्ये २ टक्के सूट दिल्याने शेतकऱ्यांना विकासाची संधी मिळाली आहे. हा शेतकऱ्यांसाठी मोठा ऐतिहासिक निर्णय असून तो एक मैलाचा दगड असल्याचेही यावेळी पाटील यांनी म्हटले.

हेही वाचा - ...तर स्वाभिमानीचा हिसका दाखवू; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES