• A
  • A
  • A
अंतरिम अर्थसंकल्पामध्ये आमच्या हाती पुन्हा भोपळाच, कोल्हापुरातील शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर - मोदी सरकारने या टर्मचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे सांगण्यात आले. कोल्हापुरात मात्र या बजेटवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाव शेतकऱ्यांचे पण शेतकऱ्यांसाठी काहीच मिळाले नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.


हेही वाचा - BUDGET 2019 : प्राप्तिकराच्या मर्यादेत दुप्पटीने वाढ, ५ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज संसदेत सादर केलेल्या अर्थ संकल्पात शेतकऱ्यांसाठी तब्बल ७५ हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. या मदतीचा देशातील तब्बल १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विविध योजनांसह शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना जाहीर करण्यात आली. शिवाय या योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पादन साहाय्य म्हणून वर्षाला ६ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या सर्व गोष्टी अर्थसंकल्पात सादर केल्यानंतर शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होईल, अशी सरकारची अपेक्षा होती. मात्र, कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली असून नाव शेतकऱ्यांचे पण शेतकऱ्यांसाठी काहीच मिळाले नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा - BUDGET 2019 : अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार ६ हजारांची मदत
अर्थसंकल्पात गायींचे संवर्धन आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हे सरकार कोणतीही मदत करायला तयार असल्याचे सांगण्यात आले. पशुपालनासाठी अल्प व्याज दराने कर्ज पुरवठा, शेतकऱ्यांना पीककर्जात २ टक्के व्याजाची सूट, नियमित कर्ज भरल्यास ३ टक्के अधिकची सूट दिली जाणार असल्याचे गोयल यांनी जाहीर केले आहे. या घोषणेबाबत विचारणा केली असता शेतकऱ्यांनी असमाधान व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा तसाच ठेऊन आता नवीन पीक कर्जासाठी २ टक्के सूट देण्यात आली असल्याचे सांगत राजा उदार झाला आणि शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला, अशीच अवस्था झाल्याची प्रतिक्रिया कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे केंद्र सरकारने अर्थ संकल्पातून शेतकऱ्यांना खुशखबर दिल्याचे सांगत समाधान व्यक्त केले आहे, तर दुसरीकडे शेतकरी मात्र आमच्यासाठी कोणत्याही भरीव तरतूदी केल्या नसल्याचे सांगत आमच्या हाती भोपळाच दिल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - BUDGET-२०१९: रेल्वेसाठी ६४ हजार ५०० कोटी, सेमी हायस्पीड 'वंदे भारत एक्स्प्रेस'ची घोषणा


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES