• A
  • A
  • A
तळेगाव भारीच्या खुनाचे रहस्य उलगडले, चोवीस तासात आरोपी जेरबंद

यवतमाळ - शहरातील पांढरकवडा मार्गावरील शेतात एका ५० वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. जादुटोण्याच्या प्रकारातून या व्यक्तीचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.


याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. टोळी विरोधी पथकाने या प्रकरणाचा २४ तासांच्या आत उलगडा केल्याची माहिती एसडीपीओ पीयूष जगताप यांनी दिली. दिनेश नारायण मुरापे (रा. तळेगाव) असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा - आधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा, नंतरच जिल्ह्यात पाय ठेवा - शिवाजीराव मोघे
९ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास सुधाकर आत्राम (५०) हा शेतात कामाकरता जेवणाचा डब्बा घेवून गेला होता. यावेळी संशयित रतन देवकर, संदीप देवकर, दशरथ मुरापे (रा. तळेगाव) यांनी सुधाकरला दंडार नृत्य व बुवाबाजी करण्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची तक्रार सुधाकरचे वडील मंजुळा आनंद आत्राम यांनी दिली होती. त्यावरून यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

११ फेब्रुवारीला टोळी विरोधी पथकाने संशयित आरोपींचा शोध घेतला असता दुसऱया व्यक्तीने मारल्याची चर्चा होती. त्या आधारे आरोपी दिनेश मुरापेला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. १० वर्षांपूर्वी दिनेशचे वडील नारायण मुरापे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबातील अन्य सदस्य आजारी राहत होते. मृत सुधाकर आत्राम याने जादुटोना केल्याने वडीलांचा मृत्यू झाल्याचा संशय घेवून खून केल्याचे दिनेश याने सांगितले.

हेही वाचा -जिल्हाधिकारी साहेब तुम्हीच न्याय द्या; शेळ्यांसह शेतकऱ्याचे आमरण उपोषण
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप सिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली टोळी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर, ऋषी ठाकुर, संजय दुबे, गणेश देवतळे, योगेश गटलेवार, विनोद राठोड, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, जयंता शेंडे, राज कांबळे, शशिकांत चांदेकर, गौरव ठाकरे, निलेश पाटील, राम सोळंकी, राहुल जुकुंटवार, शंकर भोयर यांनी केली.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.