• A
  • A
  • A
आधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा, नंतरच जिल्ह्यात पाय ठेवा - शिवाजीराव मोघे

यवतमाळ - नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २० आश्वासने दिली होती. मात्र, आता ते सर्व आश्वासने विसरले आहेत. त्यामुळे मोदींनी आधी त्या आश्वासनांचे काय झाले ते सांगावे आणि नंतरच पांढरकवडा येथे पाय ठेवावा, असा इशारा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिला. यासाठी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाबडी या गावांमध्ये 'चाय पे चर्चा' हा कार्यक्रम २० मार्च २०१४ ला आयोजित केला होता. या कार्यक्रमाला १५०० पेक्षा जास्त ठिकाणची शेतकरी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडले गेले होते. देशभरात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. त्यात ३३ जिल्ह्यातून या चर्चेसाठी शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा आणि कुटुंबांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आश्वासने देत 'अच्छे दिन'चे स्वप्न शेतकऱ्यांना दाखविले होते.

हेही वाचा - नांदेडमध्ये एसी कोचेसची अज्ञातांकडून नासधूस; रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

मोदी पंतप्रधान होताच शेतकऱ्यांचे समस्या सुटण्याऐवजी त्या वाढतच गेल्या आहे. हुकूमशहाप्रमाणे कार्यपद्धती करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी काही नैतिकता उरली असेल तर दाबडीत येऊन आश्वासनांचे काय झाले ते सांगावे आणि त्यानंतरच पांढरकवडा येथे १६ फेब्रुवारीला होणाऱ्या मार्गदर्शन मेळावात हजर राहावे, असा इशारा माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी पत्रकार परिषदेतून दिला. यासाठी काँग्रेस पक्षाकडून वेगळया पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - जिल्हाधिकारी साहेब तुम्हीच न्याय द्या; शेळ्यांसह शेतकऱ्याचे आमरण उपोषण

राज्याचे मुख्यमंत्री विदर्भाचे असून सुद्धा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी कुठल्याच योग्य निर्णय घेण्यात येत नाही. केवळ विकास कामे केल्याचा कांगावा मुख्यमंत्र्याकडून करण्यात येत आहे. पंतप्रधानांप्रमाणे मुख्यमंत्री खोटी आश्वासने देत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचे मुर्दाड मुख्यमंत्री असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा - दुधाला अनुदान देण्याची योजना गुंडाळली, दुध उत्पादक शेतकरी हवालदिलCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES