• A
  • A
  • A
जिल्हाधिकारी साहेब तुम्हीच न्याय द्या; शेळ्यांसह शेतकऱ्याचे आमरण उपोषण

यवतमाळ - घाटंजी तालुक्यातील जुनोनी या गावातील शेळीपालक शेतकरी पंकज ठाकरे आपल्या शेळ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसला आहे. या शेतकऱ्याची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होत असून, न्याय मिळेपर्यंत हे उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा ठाम निर्धार या शेतकऱ्यांनी केला आहे.


हेही वाचा - जातीचं नाव काढणाऱ्यांना मी ठोकून काढेन - नितीन गडकरी

९ जानेवारी २०१६ ला विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने शॉर्टसर्किट झाले आणि त्याची ठिणगी पडून शेतातील शेळ्यांच्या चाऱ्याला आग लागली. या आगीत अंदाजे १५ लाख ८१ हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेला ३ वर्षे पूर्ण झाले तरीही कुठलीच नुकसान भरपाई मिळाली नाही. या घटनेची लेखी तक्रार तहसीलदार, जिल्हाधिकारी ते प्रधान सचिव यांच्याकडे करण्यात आली. इतकेच नव्हे तर आमदार, खासदार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मदन येरावार, उर्जामंत्री बावनकुळे, लोकायुक्त यांच्याकडेही तक्रार करण्यात आली.

हेही वाचा - दुधाला अनुदान देण्याची योजना गुंडाळली, दुध उत्पादक शेतकरी हवालदिल

सातत्याने ३ वर्षांपासून त्याचा पाठपुरावाही केला. या प्रकरणाची संपूर्ण फाईल नागपूर येथील उर्जा विभागाचे विभागीय संचालक कार्यालयात धूळखात पडून आहेत. या फाईलमध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. मात्र, नुकसान भरपाई मिळत नाही, अशी खंत पंकज ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे शेळीपालक शेतकरी पंकज शेळ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.
हेही वाचा - नांदेडमध्ये एसी कोचेसची अज्ञातांकडून नासधूस; रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES