• A
  • A
  • A
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पांढरकवडामध्ये

यवतमाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी १६ फेब्रुवारीला यवतमाळ जिल्हातील पांढरकवडा येथे येणार आहेत. जिल्ह्यात १७ हजार १८ महिला बचत गटांची स्थापना झाल्याने या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली. यावेळी पालकमंत्री मदन येरावार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे उपस्थित होते.


हेही वाचा-यवतमाळमध्ये ५० वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याची माहिती पोलीस प्रशासनाला दिली आहे. पांढरकवडा येथील १८ एकर विस्तीर्ण जागेची कार्यक्रमासाठी पाहणी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व उपायोजनायांचा पोलीस प्रशासनाकडून नुकताच आढावा घेण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात १७ हजार १८ महिला बचत गटांमार्फत रोजगार निर्मिती व महिलांना सक्षम करण्यासाठी हे बचतगट कार्य करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये घाटंजीतील एका बचत गटाचा उल्लेख करीत बकरीच्या दुधापासून साबण बनत असल्याचे मन की बातमध्ये सांगितले होते.
हेही वाचा-सीएमओ कार्यालयाने दखल घेताच अठ्ठेचाळ तासांत मिळाला सातबारा

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES