यवतमाळ - शहरातील पांढरकवडा मार्गावरील शेतात एका ५० वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. सुधाकर आनंदराव आत्राम (रा. तळेगाव) असे त्यांचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
सुधाकर हे गेल्या चार वर्षापासून गिलानी यांच्या शेतात काम करत होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी पियुष जगताप, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.