• A
  • A
  • A
सीएमओ कार्यालयाने दखल घेताच अठ्ठेचाळ तासांत मिळाला सातबारा

यवतमाळ - गतिमान प्रशासन कसे असते. सर्वसामान्य माणसाचे काम चुटकीसरशी कसे होते? याचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील श्रीकांत आडे यांना आला. वडिलोपार्जित जमीनीवर वारसांचे नाव घेण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईची तक्रार सीएमओ कार्यालयाने घेतल्याने त्यांची तक्रार तत्काळ सोडवण्यात आली.


सध्या पुण्यात स्थायिक असलेले श्रीकांत आडे याची उमरखेड तालुक्यातील दहागाव येथे वडिलोपार्जित ३ एकर जमीन आहे. त्या जमिनीच्या सातबाऱ्यावर त्यांच्या आजोबांच्या निधनानंतर वारसा हक्काने वडील अशोक आडे यांचे नाव आले. मात्र वडीलांच्या नावे शेती झाल्यावर वारसा हक्क म्हणून श्रीकांत यांच्या एका बहिणीचे नाव त्यात नव्हते. ते नाव सातबाऱ्यावर यावे यासाठी श्रीकांत आडे आणि त्यांच्या आईने अनेक प्रयत्न केले. या कामासाठी त्यांना अनेक फेऱ्या माराव्या लागल्या. परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही.

वाचा-अक्षम्य बेपर्वाई.. ऑपरेशननंतर महिलेच्या पोटातच कात्री विसरले डॉक्टर
शेवटी श्रीकांत आडे यांनी हतबल होऊन याबाबतची तक्रार आपले सरकार पोर्टलवर केली. या तक्रारीची दखल सीएमओ कार्यालयाने तात्काळ घेतली. ४८ तासात तहसिलदार, तलाठी यांच्यासह महसूल यंत्रणा धडपडून कामाला लागली. ऑनलाईन तक्रार मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयाने अंमलबजवणी करीत श्रीकांत आडे यांना अद्यावत असा सर्व वारसांचे नाव असलेला सात-बारा ४८ तासांत बनवून दिला.

वाचा- पंतप्रधानपदाच्या दावेदारीसाठीच पवार पुन्हा लोकसभेच्या मैदानात..!


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES