• A
  • A
  • A
यवतमाळात जि.प. शाळेला दयनीय अवस्था, पटसंख्या फक्त एक आणि दोन..

यवतमाळ - कधीकाळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळांना आता उतरती कला लागली आहे. या शाळेंना लागलेल्या गळतीमुळे शिक्षण विभागावर आत्मपरिक्षणाची वेळ आली आहे. मारेगाव तालुक्यातील रामेश्‍वर येथे एका शाळेत एक विद्यार्थी तसेच मांगली येथील जिल्हा परिषद शाळेत देखील एक शिक्षक आणि २ विद्यार्थी अशी स्थिती आहे.


हेही वाचा - अकोल्यात थ्रेशरमध्ये अडकून शेतमजुराचा मृत्यू

मारेगाव तालुक्यातील एक शाळा मोठा कुतूहलाचा विषय ठरला आहे. रामेश्‍वर येथे एक शिक्षक, एकाच विद्यार्थ्याला ज्ञानदानाचे करीत आहे. मारेगाव पंचायत समितीअतंर्गत येत असलेल्या रामेश्‍वर येथे २०० लोकांची वस्ती आहे. या गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत गावात केवळ एकच विद्यार्थी शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्याला शिकविण्यासाठी शिक्षण विभागाने एक शिक्षक नेमून दिला आहे. रोज येणे, एकाच विद्यार्थ्याला शिकविणे अन परत जाणे, असा नित्यक्रम सुरू आहे. याचबरोबर मांगली येथील जिल्हा परिषद शाळेत देखील एक शिक्षक, दोन विद्यार्थी, अशी स्थिती आहे.
हेही वाचा - हिंगणघाटच्या १४ खेळाडूंची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

रामेश्‍वर येथील शाळेत एकमेव विद्यार्थी असलेला हिमांशू जगताप हा रोज नित्यक्रमने शाळेत येतो आणि ज्ञानार्जनाचे काम करतो. आई वडील रोज मजुरी करणारे आहेत. त्यामुळे त्याला दुसरीकडे शिकायला पाठवायला परडवत नाही. त्यामुळे शाळा समितीने सांगून सुद्धा त्याच्या पालकांनी त्याला दुसऱ्या शाळेत पाठवले नाही. हिमांशु मोठेपणी डॉक्टर व्हायचे स्वप्न बाळगून आहे.

हेही वाचा - एक पत्र व्यसनमुक्तीसाठी; पाल्यांचे पालकांना भावनिक अवाहन

शिक्षण मिळवणे हा नागरिकांचा अधिकार आणि शिक्षण देणे शासनाने कर्तव्य आहे. एका विद्यार्थीसाठी शिक्षक शिकवत आहेत, त्याच कौतुक केले पाहीजे. मात्र, शिक्षकांनी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - एक मूल ३० झाडे ! शिक्षकाचा उपक्रम अभिनेता सयाजी शिंदेंना भावला

तालुक्यातील अनेक गावात शिक्षकाच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालक आंदोलन करीत आहेत. विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होते. मात्र, या दोन गावात केवळ एक व दोन विद्यार्थ्यांसाठी शिक्षक नेमण्यात आले आहेत. दोन्ही गावातील शाळेच्या अंतर केवळ २ किलोमीटर आहे. एका विद्यार्थ्याला सोयीनुसार समायोजित करून दोन शिक्षकांवर होणारा खर्च वाचविता आला असता. मात्र, शिक्षण विभागाला याचे काहीच सोयरसुतक दिसत नाही. एक विद्यार्थी एक शिक्षक आणि २ विद्यार्थी, १ शिक्षक हा शिक्षणाचा नवा प्रकार तालुक्यात चांगलाच चर्चिल्या जात आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES