• A
  • A
  • A
यवतमाळच्या पालकमंत्र्यांच्या घरावर रुग्णवाहिका चालकांचा मोर्चा

यवतमाळच्या - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारातून रुग्णवाहिकांना बाहेर काढण्याचा निर्णय अभ्यागत मंडळाने घेतला होता. त्या निषेधार्थ रुग्णवाहिका चालकांनी रुग्णवाहिकांसह पालकमंत्री मदन येरावर याच्या निवासस्थानी धडक दिली.


वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारातून रुग्णवाहिकांना बाहेर काढण्याचा आदेश पालकमंत्री मदन येरावार यांनी दिला होता. त्यानुसार भाजप आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वाखालील अभ्यागत मंडळाने निर्णय घेतला. या निर्णयाच्या निषेधार्थ महाविद्यालयातील सर्व रुग्णवाहिका घेऊन चालकांनी पालकमंत्री येरावारांचे घर गाठले. यावेळी शहराचे हृदयस्थळ असलेल्या दत्त चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
हेही वाचा - बाबा कंबलपोष उरूस; ८९ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

महाविद्यालयाच्या बाहेर काढण्याऐवजी तेथे पर्यायी रुग्णवाहिका मोठ्या संख्येने उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी या रुग्णवाहिकांच्या चालकांनी केली आहे. नागपुरातील एक डॉक्टर या रुग्णवाहिका चालकांना मॅनेज करतो. म्हणून या रुग्णवाहिका रुग्णांना त्याच डॉक्टरच्या दवाखान्यात भरती करतात, असा आरोप प्रवीण प्रजापती यांनी केला होता. त्यावरूनच या रुग्णवाहिका महाविद्यालयाच्या बाहेर काढण्याचा निर्णय अभ्यागत मंडळाने घेतला.

हेही वाचा - वडकी ठाण्याला 'आयएसओ' नामांकन; असा दर्जा मिळालेले जिल्ह्यातील पहिले ठाणे

रुग्णवाहिका चालकांच्या प्रश्नावर योग्य निर्णय न झाल्यास बहिष्कार आंदोलन कायम राहणार आहे. यामुळे अपघात, मृत्यू अथवा कुठल्याही घटनेत रुग्णाला बाहेरगावी नेले जाणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES