• A
  • A
  • A
शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या पंतप्रधान मोदींना काँग्रेसने पाठवला १७ रुपयांचा डीडी

यवतमाळ - केंद्र सरकारच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना ६ हजार रुपये वार्षिक मदतीची घोषणा करण्यात आली. मात्र, सरकारची ही घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे. या गोष्टीचा निषेध करत काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना १७ रुपयांचा डिमांड ड्राफ्ट पाठवण्यात आला आहे.



केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६ हजार रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, २०१४ च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील दाभाडी येथे चाय पे चर्चा कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना अनेक मोठी आश्वासने दिली होती. मात्र, त्यातील एकही आश्वासन सरकार पूर्ण करू शकले नसल्याचा आरोप काँग्रेसच्या अनुसूचित सेलचे जिल्हाध्यक्ष सुनील भेले यांनी यावेळी केला.

भेले म्हणाले, मोदी सरकारने सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामधील शेतकऱ्यांना दिली जाणारी आर्थिक मदत प्राप्त करण्यासाठी अनेक अटी लादण्यात आल्या आहेत. तसेच ही मदत टप्प्या-टप्प्याने दिली जाणार असून १७ रुपयांची ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. त्यामुळे मोदी सरकारच्या या गोष्टीचा निषेध करण्यासाठी १७ रुपयांचे डिमांड ड्राफ्ट पाठवण्यात आले आहेत. यावेळी १७ रु चे एकूण १० डीमांड ड्राफ्ट पाठवण्यात आले असल्याची माहिती सुनील भेले यांनी दिली.

हेही वाचा - पुणतांब्यात अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या मुलींची प्रकृती चिंताजनक; एकीला...




CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES