• A
  • A
  • A
वडकी ठाण्याला 'आयएसओ' नामांकन; असा दर्जा मिळालेले जिल्ह्यातील पहिले ठाणे

यवतमाळ - जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यांपैकी प्रथम आय. एस. ओ. मानांकित होण्याचा मान वडकी पोलीस ठाण्याला मिळाला आहे. वडकी ठाण्याला हा बहुमान ठाणेदार प्रशांत गिते यांनी मिळवून दिला आहे.


पोलीस ठाण्यात जायचे म्हटले तर सामान्य माणसाच्या चेहर्‍यावर वेगळाच भाव दिसून येतो. मात्र, ही परिस्थिती बदलावी यासाठी वडकी पोलीस ठाण्याला ७ महिन्यांपूर्वी रूजू झालेले ठाणेदार प्रशांत गिते यांनी जोरदार प्रयत्न सुरू करत ठाण्याचा कायापालट केला. दैनंदीन कामकाजात सुसूत्रता व कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. अल्पावधीतच जनतेच्या सहकार्याने लोकसहभागातून सुसज्ज इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. यासह जवळजवळ अडीचशे मीटर डांबरी रस्त्याचे काम पूर्ण केले.
हेही वाचा - बाबा कंबलपोष उरूस; ८९ वर्षांची ऐतिहासिक परंपरा
वडकी पोलीस ठाण्याच्या सुसज्ज इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर आय. एस. ओ. नामांकन मिळविण्यासाठी पोलीस ठाण्याच्या परीसरात विविध जातीचे वृक्षारोपण करुन महिला पुरुषांसाठी स्वच्छतागृह व पोलीस ठाण्याच्या इमारतीला संपूर्ण रंगरंगोटी करण्यात आली. त्यानंतर अंतर्गत कार्यालयातील कक्षनिहाय गोपनीय, ठाणे अंमलदार, गुन्हे शाखा, विशेष तपास पथक, वेगवेगळे बिट अंमलदार कक्ष, बिनतारी संदेश कक्ष, दूय्यम अधिकारी कक्ष, अशा विविध विभागांच्या कार्यालयास नामफलक लावण्यात आले. त्याचबरोबर प्रतिबंध कारवाई, परिसरातील सराईत गुन्हेगारांवरील हद्दपार प्रस्ताव, गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक, अशा सर्व फाईल्स अद्ययावत करून सर्व निकष पूर्ण केल्यानंतर आय. एस. ओ. नामांकन मिळविण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता.

हेही वाचा - सावित्रीच्या लेकीच्या हाती एसटीचे स्टेरिंग, २५ मुलींनी स्वीकारले आव्हान
सर्व निकष पूर्ण झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला २३ जानेवारी रोजी आय. एस. ओ. मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले. हे प्रमाणपत्र प्रजासत्ताकदिनी यवतमाळ येथे जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या उपस्थितीत वडकी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रशांत गिते यांना देण्यात आले. अवघ्या ७ महिन्यांच्या कालावधीत वडकी ठाण्याचा कायापालट ठाणेदार गिते यानी घडवून आणला आहे.
यवतमाळ जिल्ह्याचा गौरव
वडकी पोलिसांनी एक उत्तम ऐतिहासिक कामगिरी केली असून या पोलीस स्थानकाला मिळालेला बहुमान हा पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी मिळवून दिला आहे. जिल्ह्यातील उर्वरित ३० पोलीस ठाणे आय. एस. ओ. व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES