• A
  • A
  • A
प्रेमीयुगुलाची आत्महत्या; २ दिवसांपासून होते बेपत्ता, विहिरीत आढळले मृतदेह

यवतमाळ - प्रेमीयुगुलाने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रेमीयुगूल मागील २ दिवसांपासून बेपत्ता होते. दोघांचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भोयर शिवारात ही घटना घडली आहे. निकिता गिरनाळे (१७) आणि दीपक जाधव २१ वर्ष अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.


हेही वाचा-सावित्रीच्या लेकीच्या हाती एसटीचे स्टेरिंग, २५ मुलींनी स्वीकारले आव्हान
लोहारा गावात राहणाऱ्या दीपक जाधवचे यवतमाळच्या एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनी निकिता गिरनाळेशी प्रेम संबंध होते. तसेच या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले होते. आपआपल्या घरच्यांना याची कल्पना द्यावी, आणि त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन लग्न करावे, असे दोघांनी ठरवले होते.
याबाबत दोघांनीही आपल्या आई-वडिलांना आपल्या प्रेमसंबंधाबाबत सांगितले होते. मात्र, त्यांच्या घरच्यांनी प्रेमाला विरोध केला. त्यानंतर हे दोघेही रविवारपासून बेप्पता होते. त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार कुटूंबियांनी लोहारा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी या दोघांचा शोध सुरु केला होता. दरम्यान, आज सकाळी दोघांचेही मृतदेह भोयर परिसरातील गिट्टी खदानीच्या साचलेल्या पाण्यात आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शोधकर्त्याच्या माध्यमातून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. प्रेमाला कुटुंबियांचा विरोध असल्याने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा-माजी राज्यमंत्री संजय देशमुखांच्या घरावर आयकर विभागाची धाडCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES