• A
  • A
  • A
सावित्रीच्या लेकीच्या हाती एसटीचे स्टेरिंग, २५ मुलींनी स्वीकारले आव्हान

यवतमाळ - आज महिला सर्वच क्षेत्रांत पुढे येत असतानाच राज्याच्या इतिहासात प्रथमच परिवहन महामंडळात यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींना वाहनचालक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे. यासाठी निवड झालेल्या मुलींच्या अभ्यासपूर्व प्रशिक्षणाला प्रारंभ झाला आहे.


हेही वाचा - माजी राज्यमंत्री संजय देशमुखांच्या घरावर आयकर विभागाची धाड
राज्यातही महिलांना एसटी चालक म्हणून संधी द्यावी, अशी विनंती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली होती. त्यांनी ती मान्य केली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्य परिवहन महामंडळात विशेष बाब म्हणून अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला चालकांची भरती करण्याची घोषणा केली. आदिवासी बहुल यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे शंभर मुलींची भरती करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, हे आव्हान स्वीकारण्यासाठी केवळ २५ मुली पुढे आल्या. यानंतर त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था करून त्यांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यांचे हलके आणि अवजड वाहनचालक परवाने काढण्यात आले.

मुंबईत गेल्या वर्षी २१ जानेवारी २०१८ ला मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या एका समारंभात या मुलींना महामंडळात वाहनचालक म्हणून नियुक्ती देण्याची घोषणा रावते यांनी केली. त्यानंतर उद्‌भवलेल्या विविध तांत्रिक अडचणी पार करीत एक वर्षानंतर यातील २१ मुलींचे चालकपूर्व प्रशिक्षण सुरू झाले आहे. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्यांमध्ये सुवर्णा मेश्राम, मनीषा गाडेकर, हर्षा लडके अशा अनेक महिलांचा समावेश आहे.


हेही वाचा - यवतमाळमध्ये अवैद्य देशी दारूसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES