• A
  • A
  • A
माजी राज्यमंत्री संजय देशमुखांच्या घरावर आयकर विभागाची धाड

यवतमाळ - माजी क्रीडा राज्यमंत्री व भाजप नेते संजय देशमुख यांच्या घरी आज आयकर विभागाने धाड टाकली आहे. जिल्ह्यातील चिंचोली येथील निवासस्थानी ही धाड टाकण्यात आली असून आयकर व इतर विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मिळून जवळपास २० जणांचा या धाड पथकात समावेश आहे.


संजय देशमुखांनी आर्णी मतदारसंघाचे १९९९ ते २००४ दरम्यान विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना २००४ मध्ये त्यांच्याकडे क्रीडाराज्यमंत्रीपदाचा पदभारही होता. दरम्यान, या धाडीबाबत नेमकी माहिती कळू शकली नाही. संपूर्ण तपास होईपर्यंत ही कार्यवाही चालूच राहील, अशी माहिती आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. दुसरीकडे या धडक कारवाईमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- 'भाभी'जीने घेतली राजकारणात उडी; शिल्पा शिंदेची काँग्रेसमध्ये एन्ट्री

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES