• A
  • A
  • A
यवतमाळमध्ये अवैद्य देशी दारूसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ - दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात ट्रकमधून जाणारी अवैद्य देशी दारू टोळी विरोधी पथकाने पकडली आहे. ही कारवाई शहरातील शारदा चौक परिसरातील मोक्षधामजवळ करण्यात आली.


हेही वाचा - नाणार प्रकरणी सुकथनकर समिती रत्नागिरीत दाखल; पोलिसांचा चोख बंदोबस्त

या प्रकरणी पोलिसांनी देशी दारू आणि अठरा चाकी ट्रक असा एकूण २० लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, कारवाईदरम्यान ट्रक चालक पसार होण्यात यशस्वी झाला. शहरातील पांढरकवडा मार्गावर असलेल्या मोक्षधाम परिसरातून एक ट्रक दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य देशी दारू घेवून जात असल्याची माहिती टोळी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने मोक्षधाम परिसरात सापळा रचून ट्रक पकडला. दरम्यान, पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता ट्रकच्या खालच्या बाजूने तयार करण्यात आलेल्या कप्प्यात २२ पेट्या देशी दारू आढळून आली. या प्रकरणी ट्रकचालकाविरोधात अवधुतवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

हेही वाचा - मंगळवारपासून राळेगणसिद्धीत चूल पेटणार नाही, ग्रामस्थांचा सरकारला इशारा
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES