• A
  • A
  • A
यवतमाळमधील एकाच महाविद्यालयातील एमबीएचे ९० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण

अमरावती - मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या (एमबीए) परीक्षेत चक्क ९० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने यवतमाळच्या जाजू महाविद्यालयाचे विद्यार्थी थेट संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात धडकले. सर्व पेपर चांगले सोडविले असतानाही असा अनपेक्षित निकाल आल्याने विद्यार्थ्यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.


हेही वाचा - अमरावतीतील अनाथ वधु-वराचा विवाह ठरणार राष्ट्रीय सोहळा - आनंदराव अडसूळ

याप्रकरणी जाजू महाविद्यालयातील एमबीए विभागाच्या २५ ते ३० विद्यार्थ्यांनी परीक्षा नियंत्रक हेमंत देशमुख यांच्याकडे तीव्र रोष व्यक्त केला. केवळ दोनच उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करता येत असल्याने वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सगळे पेपर्स चांगले सोडविले असतानाही आम्ही अनुत्तीर्ण होणे, ही धक्कादायक बाब आहे. आम्हाला सर्वच विषयात अनुत्तीर्ण करण्यात आले. याप्रकरणी चौकशी करून निर्णय घेतला गेला नाही तर वर्ष वाया जाईल, अशी चिंता विद्यार्थ्यांनी यावेळी मांडली. दरम्यान, कुलगुरूंशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण देत परीक्षा नियंत्रकानी विद्यार्थ्यांची समजूत काढली.

हेही वाचा - ६ फेब्रुवारीला अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES