• A
  • A
  • A
साहेब न्याय कधी मिळेल? २८ शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

यवतमाळ - मागील ३ वर्षांपासून टॉवरसाठी जमिनी देऊनसुद्धा योग्य मोबदला मिळाला नाही. मोबदला मिळावा यासाठी वारंवार शासकीय कार्यालयापासून ते उर्जा मंत्र्यापर्यंतचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. आज ३ वर्षे झाले तरी वाढीव मोबदला मिळाला नाही. त्यामुळे आज (सोमवारी) जिल्हाधिकाऱ्यांना साहेब न्याय कधी मिळेल? असा २८ शेतकऱ्यांनी सवाल केला.


हेही वाचा-अवैध दारू धंद्याविरोधात पोलिसांची ‘वॉश आऊट’ मोहीम; ५६३ आरोपींना अटक
पावर ग्रीड कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीतर्फे आर्णी तालुक्यातील तळणी, अंजी, चांदापूर, चिंचोली या गावातील २८ शेतकऱ्यांच्या टॅावरसाठी २० गुंठे क्षेत्रफळ जमिनी घेण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मनमानी करून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित न करता जमिनी ताब्‍यात घेतल्या. टॉवर उभे करताना पिकांचे व फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. टॉवर उभे करताना शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी घेण्यात आली नाही. टॉवरसाठी जमिनी देताना विरोध केला. त्यावेळी शेतकऱ्यांना शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याचा खोटा आरोप करून घाटंजी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. तसेच फौजदारी गुन्हे दाखल करू, अशी धमकीही देण्यात आली.
शेतकऱयांना पोलीस ठाण्यात बसूवून ठेवण्यात आले आणि याच कालावधीत शेतकऱ्यांच्या शेतामधून टॉवरची उभारणी करण्यात आली. यासंदर्भात शेतकरी मागील ३ तीन वर्षांपासून जमिनीच्या मोबदल्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. तहसीलदार पासून जिल्हाधिकारी, ऊर्जामंत्री बावनकुळे, ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री मदन येरावार, आमदार ख्वाजा बेग, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, कोणीच याची अद्यापर्यंत दखल घेतली नाही. त्यामुळे योग्य निर्णय न लागल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
हेही वाचा-पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते जिल्ह्यातील पांदण रस्त्यांचे भूमिपूजनCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES