• A
  • A
  • A
अवैध दारू धंद्याविरोधात पोलिसांची ‘वॉश आऊट’ मोहीम; ५६३ आरोपींना अटक

यवतमाळ - जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध दारू धंद्याविरोधात पोलीस प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात ‘वॉश आऊट’ मोहीम राबविली. या मोहिमेत जिल्ह्यात ३७ लाख १७ हजार ३५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध दारू व्यवसाय करणारे, गावठी दारू निर्मिती करणाऱ्या अशा एकूण ५६३ जणांना अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा - पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते जिल्ह्यातील पांदण रस्त्यांचे भूमिपूजन
यवतमाळ जिल्ह्यात एकूण ३१ पोलीस ठाणे आहेत. जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध दारू धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या नेतृत्वात ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात आली. यात स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे विशेष पथक तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामधील अधिकारी-कर्मचाऱयांचा समावेश होता. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात एकूण ५५० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ५६३ जणांवर कारवाई करून अटक करण्यात आली.पोलीस प्रशासनाने अवैध दारु धंद्याविरोधात उघडलेल्या या ‘वॉश आऊट’ मोहिमेमुळे दारु विक्रेते, गावठी दारू निर्माण करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा - राळेगाव तलावाशेजारी साकारणार आधुनिक पर्यटन केंद्र
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES