• A
  • A
  • A
राळेगाव तलावाशेजारी साकारणार आधुनिक पर्यटन केंद्र

यवतमाळ - राळेगाव शहराचा ऐतिहासिक वारसा व ओळख असलेल्या तलावा शेजारी भव्य आधुनिक पर्यटन केंद्र साकारणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती त्रिकाया असोसिएट्सच्या संचालिका आर्किटेक्ट अश्विनी गंभीर यांनी दिली. त्या तलावाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या.

या तलावाचा विकास आराखडा राज्य पर्यटन विभाग आणि औरंगाबादच्या त्रिकाया असोसिएट्सकडून बनवण्यात आला आहे. यामध्ये टेनसील रुफ असलेल्या भव्य प्रवेशद्वार, जॉगिंग ट्रॅक, फूड पार्कसाठी दुकाने, मुलांसाठी खेळणे, बगीचा, योगा सेंटर, अबालवृद्धांसाठी बेंचेस, घाटांचे सुशोभीकरण व तिथे बोटिंगची व्यवस्था, ५०० लोकांची बसण्याची व्यवस्था असलेले अॅम्फी थिटर, स्वामी विवेकानंदाचा भव्य पुतळा, सेल्फीपॉइंट या शिवाय इतरही अनेक सोयी सुविधा असलेले भव्य पर्यटन केंद्र लवकरच साकारण्यात येणार आहे.

हेही वाचा - मंगरुळ येथे काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन
या प्रकल्पामुळे राळेगावच्या सौंदयीकरणात भर पडणार आहे. वरील कामाची निविदा प्रकिया आटोपली असून कंत्राटदाराने लवकर काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती अश्विनी गंभीर यांनी यावेळी दिली.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES