• A
  • A
  • A
वर्ध्यात अनियंत्रित ट्रॅव्हल्सने कारसह ८ दुचाकींना ठोकरले

वर्धा - एका अनियंत्रित ट्रव्हल्सने वर्ध्यातील रेल्वे स्थानकालगत उभ्या असलेल्या वाहनांना ठोकरल्याची घटना घडली. यामध्ये कारसह ८ दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.


हेही वाचा - अज्ञात वाहनाच्या धडकने वर्ध्यातील दुचाकीस्वार ठार
ट्रॅव्हल्सचा मालक अमोल बोकड याच्याकडे प्रवीण बोरकर हा क्लिनर आहे. तो आज गाडी काढत होता. गाडी चालवत असताना त्याने ब्रेकऐवजी अॅक्सीलेटरवर पाय ठेवला. त्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली गाडी ही रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालय किराणा दुकानापुढे असलेल्या ८ दुचाकी आणि ४ सायकलींना ठोकरले. सुदैवाने विद्युत खांब आणि झाडाला धडक दिल्याने ही ट्रॅव्हल्स थांबली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यावर नागरिकांनी ट्रॅव्हल्स चालकाला चांगलाच चोप दिला. वाहनांचे नुकसान झाल्याने भरपाईची मागणी केली जात आहे. काही नागरीकांनी रस्त्याचा कडेला असलेल्या दुचाकींवर कारवाईचीही मागणी केली.

हेही वाचा - शेतकऱ्याच्या सतर्कतेने वाचले नीलगाईचे प्राण, वन विभागासह शेतकऱ्यांचे प्रसंगावधान

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES