• A
  • A
  • A
अज्ञात वाहनाच्या धडकने वर्ध्यातील दुचाकीस्वार ठार

वर्धा - जिल्ह्यातून जात असलेल्या नागपूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सावळी (खुर्द) फाट्याजवळ दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली. अपघात सायंकाळी ७ च्या सुमारास झाला असून यात दुचाकीस्वार ठार झाला. मृताचे नाव भोजराज महादेव रमधम (३१) असे आहे.


यावेळी भोजराजसोबत आणखी एकजण दुचाकीने येनगावमध्ये जात होता. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. भोजराज महिंद्रा फायनान्स कंपनीत काम करत होता. कर्ज वसूलीला जात असताना त्याचा अपघात झाला. जखमीचे नाव नरेश डोंगरे असून त्याला कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - शिवसेनेचे दबावतंत्र, शिवसेनेला १९९५ च्या सूत्रानुसार हव्यात विधानसभेच्या १६९ जागा
दरम्यान, मागील १५ दिवसांपूर्वी अशाच प्रकारे अन्य एक व्यक्ती सायंकाळी काम संपवून घरी येत होता. यावेळी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES