• A
  • A
  • A
शेतकऱ्याच्या सतर्कतेने वाचले नीलगाईचे प्राण, वन विभागासह शेतकऱ्यांचे प्रसंगावधान

वर्धा - कारंजा येथील रघुनाथ नासरे यांच्या शेतातील विहीरीत पडलेल्या नीलगाईला वनविभागाने 'रेस्क्यू ऑपरेशन' करत वाचवले. वनविभागाचे पी. पी. कडसाईत, रामू उईके, पी. जी. खवसी, आकाश भलावी, गुलाब देवासे, दिनेश गिरी, हिंगवे आणि शिवारातील शेतकऱ्यांच्या मदतीने निलगाईला वाचवण्यात आले आहे.


हेही वाचा -वर्ध्यात गोठ्यात बांधलेल्या १० शेळ्यांचा वाघाने पाडला फडशा
कारंजा येथील शेतकरी विनोद ठोंबरे हे आपल्या शेतात गेले. त्यांना लगतच्या रघुनाथ नासरे यांचा शेतातील विहिरीतून आवाज येत असल्याने ते पाहायला गेले. यावेळी त्यांना विहरीमध्ये नीलगाय आढळून आली. त्यांनी शेतमालक रघुनाथ महादेव नासरे याना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. रघुनाथ नासरे यांनी लगेच शेताकडे धाव घेत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली.
हेही वाचा - बसमधून खाली पडल्याने कॉलेज विद्यार्थिनी गंभीर जखमी
वन विभागाचे कर्मचारी पी. पी. कळसाईत यांना महिती मिळताच ते आपल्या वनविभागाच्या चमूसह घटनास्थळी पोहचले. निलगाईला विहिरीतून बाहेर काढण्याकरता वनविभागाच्या चमूने काम सुरू केले. १ तासाच्या अथक परिश्रमाने नीलगाईला विहीरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. पी. पी. कडसाईत, रामू उईके, पी. जी. खवसी, आकाश भलावी, गुलाब देवासे, दिनेश गिरी, हिंगवे आणि शिवारातील शेतकऱ्यांच्या मदतीने निलगाईला वाचवण्यात आले. रेस्क्यूनंतर निलगाईला जंगल परिसरात सोडण्यात आले.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES