• A
  • A
  • A
वर्ध्यात सर्प दंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

वर्धा - सेलू तालुक्यातील महाबळा येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी शेतात काम करताना त्यांना सापाने दंश केला होता. अरविंद पाहुणे (वय ४८) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. साप चावल्याचे लक्षात येताच लागलीच त्यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.


अरविंद हे नेहमी प्रमाणे शेतात काम करण्यास गेले होते. पीक पाहणी करत असताना अचानक त्यांना सापाने चावा घेतला. त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्यांची प्राण्याजोत मालवली. या घटनेने गावात शोकाकुल वातावरण झाले आहे. अरविंद यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई वडील असा परिवार आहे.

वाचा - बसमधून खाली पडल्याने कॉलेज विद्यार्थिनी गंभीर जखमी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES