• A
  • A
  • A
वर्ध्यात गोठ्यात बांधलेल्या १० शेळ्यांचा वाघाने पाडला फडशा

वर्धा - समुद्रपूर तालुक्यातील धामणगाव (गाठे) येथे गावालगतच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांचा रात्री अंधारात वाघाने फडशा पाडला. या घटनेत शेतकरी वसंतराव आडे यांचे नुकसान झाले. वन विभागाने लवकरात लवकर आडे यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकरी करत आहे. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


गावलागतच्या गोठ्यात वाघ येऊन गेल्याच्या माहिती मिळताच गावकऱ्यांनी गोठ्याजवळ गर्दी केली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. या गोठ्यात १६ शेळ्या होत्या. त्यापैकी १० शेळ्यांचा वाघाने फडशा पाडला. या हल्ल्यात ५ शेळ्या वाचल्या. शेतकरी वसंतराव आडे यांचे १ लाख २० हजारांचे नुकसान झाले.

हेही वाचा - वर्ध्यात नाकेबंदीदरम्यान दारू जप्त, चालक वाहन सोडून पसार
मंगरूळचे सहवन परिक्षेत्र अधिकारी एच एन नरडंगे, वनरक्षक, जिल्हा परिषद सदस्य यांनी भेटी दिल्या. यावेळी लोकांनी शेतात जाताना मिळून एकत्र जावे, हातात गरजेनुसार लाठी सोबत ठेवावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले.

हेही वाचा - बसमधून खाली पडल्याने कॉलेज विद्यार्थिनी गंभीर जखमी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES