• A
  • A
  • A
वर्ध्यात गरजवंताना 'जिव्हाळा'ने जपले, सेवाभावी संस्थेचा उपक्रम

वर्धा - शहरातील 'जिव्हाळा' या सेवाभावी संस्थेने आज वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातून आलेल्या २०० दिव्यांग बांधवाना गरजेनुसार साहित्य वाटप करण्यात आले.


हेही वाचा - हिंगणघाटच्या १४ खेळाडूंची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

जिव्हाळा ही सेवाभावी संस्था जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून काम करत आहे. या कामाला दोन वर्ष पूर्ण झाले आहे. समाजात अनेक गरजूंना पैशांअभावी न मिळानारा उपचार असो की आर्थिक गरजेमुळे उपासमारीची वेळ असो, याची माहिती जिव्हाळ्याचा सदस्यांना होताच एकत्र येऊन आर्थिक मदतीची स्वतः जुळवाजुळव करून ते गरजूंची 'जिव्हाळयाने' काळजी घेतात.
हेही वाचा - ६ दिवसांनंतर कृषीकन्यांनी सोडले उपोषण, राज्यमंत्री खोतकरांच्या हस्ते घेतले नारळपाणी

विशेष म्हणजे वर्षभरात २१ रुग्णांना आर्थिक मदत देत शस्त्रक्रियेच्या खर्चात खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत केला आहे. तसेच या वर्षात ६७० रुग्णांना त्या त्या गटाचे रक्त मिळवून देत शस्त्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर मात करू शकल्याची माहिती संस्थेचे सचिव किशोर ठाकरे यांनी दिली.
हेही वाचा - गडावरचा गडकरी खुप महत्वाचा, राज ठाकरेंचे सुचक वक्तव्य

यात शहरातील व्यवसायिक मंडळी, तरुण युवक, नोकरी करणारे, असे अनेक हात एकत्र येत जिव्हाळा या संस्थेच्या माध्यमातून कुठलाही स्वार्थ आणि भेद न ठेवता मदतीत खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहे.
वर्षपूर्तीनिमित्त आज वृक्षारोपण करण्यात आले. २०० दिव्यांग बांधवाना गरजेनुसार कोणाला व्हिल चेअर, कोणाला कर्ण यंत्र, अंध काठी, खुर्ची असे वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात काहींना न मिळाल्यास त्या दिव्यांग बांधवांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात योग्य कागदपत्रासह येऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन या निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी केले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES