• A
  • A
  • A
वर्ध्यात नाकेबंदीदरम्यान दारू जप्त, चालक वाहन सोडून पसार

वर्धा - वर्ध्यातील हिंगणघाट उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा पथकाने दारू वाहतुकीच्या माहितीवरून नाकेबंदी केली होती. यावेळी दारू घेऊन जाणारी गाडी वेळा हिंगणघाट गावाजवळ आली. त्यावेळी पोलीस दिसताच वाहन चालक गाडी तेथेच ठेवून पसार झाला. गाडीची तपासणी केली त्यावेळी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. त्यामधून एकूण ६ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


हेही वाचा-बसमधून खाली पडल्याने कॉलेज विद्यार्थिनी गंभीर जखमी
अमरावती येथून हिंगणघाटमार्गे दारूची वाहतूक होणार असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे अजय अवचट आणि शेखर डोंगरे यांनी एसडीपीओ भीमराव टेळे यांना माहिती देत वर्धा हिंगणघाट मार्गवर वेळा गावाजवळ शुक्रवारी रात्री नाकेबंदी केली होती. त्यावेळी नाकेबंदी दिसताच (एमएच-०४-एडब्ल्यू-१६४९) चालक गाडी तेथेच सोडून पसार झाला. पोलिसांनी तत्काळ गाडीची तपासणी केली. यामध्ये देशी दारूच्या ४ हजार ७०४ छोट्या बॅाटल मिळून आल्या. हिंगणघाट पोलीस दारू वाहतूक करणारी गाडी कोणाच्या मालकीची आहे? गाडी कोण चालवत होते? याचा शोध घेत आहे.

हेही वाचा-हिंगणघाटच्या १४ खेळाडूंची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES