बसमधून खाली पडल्याने कॉलेज विद्यार्थिनी गंभीर जखमी
वर्धा - विद्यार्थिनी बसमध्ये चढत असताना चालकाने अचानक बस पुढे नेल्याने विद्यार्थीनी खाली पडल्याची घटना वर्धा बसस्थानकात घडली. यात बसचे पुढचे चाक लागल्याने विद्यार्थिनींच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे.
हेही वाचा - हिंगणघाटच्या १४ खेळाडूंची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड रोशनी येनुरकर असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. ती बापूराव देशमुख अभियांत्रिकी कॉलेजमध्ये तृतीय वर्षात शिकत आहे. ती वर्धा ते समुद्रपूर यास बसमध्ये प्रवासासाठी चढत होती. तेव्हा अचानक चालकाने बस पुढे नेली. त्यामुळे रोशनी धक्का लागून खाली पडली. तेव्हा बसच्या पुढच्या चाकाचा काही भाग लागल्याने ती जखमी झाली. जखमी रोशनीला तत्काळ सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.