• A
  • A
  • A
हिंगणघाटच्या १४ खेळाडूंची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

वर्धा - पुवर चिल्ड्रन एज्युकेशन हेल्प ट्रस्ट मुंबईद्वारा राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघनिवड चाचणीसाठी फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली. यात १४ वर्षे वयोगटातील हिंगणघाटच्या ब्राईट फ्युचर क्लब व एबी ग्रुपच्या संघाने विजेतेपद पटकावले. हिंगणघाटच्या खेळाडूंनी अप्रतिम गोल करत अनेकांची मने जिंकली. या फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षीय गटाने पहिले स्थान तर १२ आणि १५ वर्षातील गटाने दुसरे स्थान मिळवले. तसेच १४ खेळाडूंची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवडही झाली. हिंगणघाटात खेळाडू पोहचताच जंगी स्वागत करण्यात आले. स्पर्धेत १७, १४ आणि १२ वर्षे वयोगटातील ३ संघ सहभागी झाले होते.


हेही वाचा - आता इंग्लंडची खैर नाही, ६ महिन्यानंतर ख्रिस गेलची संघात 'एन्ट्री'
तसेच १२ वर्षे वयोगटातील सामन्यात एबीग्रुपच्या संघाने दुसरे स्थान मिळवले. १७ वर्षाखालील वयोगटाच्या ब्राईट फ्युचर क्लब संघाने दुसरे स्थान पटकावले. यात एकट्या हिंगणघाट येथील राष्ट्रीय संघाच्या निवड चाचणीत १४ खेळाडूंना निवड झाल्याने यशाचा झेंडा मुंबईत रोवला. यावेळी हिंगणघाट शहारत या खेळाडुंचे आगमन होताच रेल्वे स्थानकापासून ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.


कौस्तुभने केले ३१ गोल
कौस्तुभ देशपांडे या १४ वर्ष वयोगटातील खेळाडूने पहिल्या सामन्यात ११ गोल करत अप्रतिम कामगिरी केली. दुसऱ्याही सामन्यात ८ गोल करत संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. एकंदर पूर्ण सामन्यात त्याने ३१ गोळा करत वेगळी ओळख निर्माण केली, तर यश झाडे आणि बेस्ट डिफेन्सर म्हणून बक्षीस मिळवले.
हेही वाचा - २० वर्षापूर्वी जम्बोने पाकिस्तानविरुद्ध केला होता 'हा' पराक्रम

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES