• A
  • A
  • A
जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध भांडारामध्ये आग, जीवीतहानी नाही

वर्धा - जिल्हा सामान्य रुग्णालयातील आपात्कालीन विभागात गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. ही आग औषधभांडाराला लागली, यावेळी रुग्णालयातील कर्मचऱ्यासह डॅाक्टर अनुपम हिवलेकर यांनी अग्नीरोधक यंत्र आणि पाण्याच्या साहाय्याने आगीवर मारा करत आग नियंत्रित केली. यामध्ये कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मात्र, औषधीचे किरकोळ नुकसान झाले.


महिला परिचारिकेला औषध भांडार खोलीमधून धूर निघताना दिसला. त्यांनी त्वरीत कर्मचाऱ्यांना माहिती दिली. लागलीच आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. यावेळी काही वेळासाठी संपूर्ण विभागात काळोख पसरल्याने दिसेनासे झाले. आग विझवण्यासाठी प्रयत्न करताना अडचणी निर्माण झाल्या. अखेर या खोलीतील औषधी साहित्य बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा - नवीन रेड्डीने पटकावला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वनसेवा परीक्षेत पहिला क्रमांक
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रुग्णांना काही अडचण होऊ नये यासाठी त्यांना इतर वार्डमध्ये हलवण्यात आले. तसेच सायंकाळी येणाऱ्या रुग्णांना कुठलाही त्रास होऊ नये याची सुद्धा व्यवस्था केली असल्याची माहिती डॉ. मडावी यांनी दिली.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES