• A
  • A
  • A
वर्ध्यात दोन घरांमध्ये चोरट्यांचा डल्ला, साडेचार लाखांचा ऐवज लंपास

वर्धा - खडसे लेआऊटमधील अष्टविनायक अपार्टमेंटमधील दोन घरांत चोरी झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन चोरांनी पोबारा केला. यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वर्ध्यातील अष्टविनायक अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावर राहुल कासार यांचे घर आहे. ते पिंपरी येथील महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. बुधवारी सायंकाळी ते बाहेरगावाहून परत आले असता, त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. घरातील कपाट तपासले असता, रोख रक्कम आणि १२ तोळे सोने चोरीला गेल्याचे त्यांना आढळून आले.
हेही वाचा - वर्ध्यात सुरक्षा सप्ताहाचे उद्धघाटन; शाळकरी विद्यार्थ्यांची पथनाट्यातून जनजागृती

तसेच, तिसऱ्या माळ्यावर राहणारे डॉ. अजाब धाबर्डे यांच्या घरातही चोरी झाली. त्यांच्या घरातील ४ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. आजुबाजूला सीसीटीव्ही नसल्याने चोरांचा कुठलाही पुरावा मागे राहिला नाही.

हेही वाचा - चौकीदाराची हत्या जादुटोण्याच्या संशयातून; ५ हजारासाठी तिघांनी केली हत्या

पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून फिंगर प्रिंट एक्स्पर्ट, तसेच पोलीस श्वानाच्या माध्यमातून चोरट्यांचा मागोवा घेत मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. तपास सुरू असल्याची माहिती राम नगरचे पोलीस निरीक्षण अशोक चौधरी यांनी दिली.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES