• A
  • A
  • A
चौकीदाराची हत्या जादुटोण्याच्या संशयातून; ५ हजारासाठी तिघांनी केली हत्या

वर्धा - देवळी तालुक्यातील इंझाळा येथे शेळी फार्मवर काम करणाऱ्या चौकीदाराची हत्या करण्यात आली. सुरुवातीला ही हत्या बकरी चोरण्यातून झाली असल्याचा कयास लावला जात होता. तपासादरम्यान ही हत्या मृत श्रावण पंधराम हा जादुटोणा करतो, या संशयातून करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा -वर्ध्यात सुरक्षा सप्ताहाचे उद्धघाटन; शाळकरी विद्यार्थ्यांची पथनाट्यातून जनजागृती
विशेष म्हणजे ही हत्या तिघांना मिळणाऱ्या केवळ ५ हजार रुपयांसाठी केल्याचे सुद्धा कबूल करण्यात आले असून चौघांना अटक करण्यात आले आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
वर्ध्यातील पूलगाव पोलीस ठाण्यांतर्गत इंझाळा येथील मंगेश भानखेडे यांच्या शेतातील शेळी फार्मवर मृत श्रावण पंधराम (वय ७५) हा चौकीदार म्हणून काम करत होता. घटनेच्या दिवशी त्याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने गंभीर वार करण्यात आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बकरी चोरट्यांनी हे कृत्य केल्याच्या संशयावरून अज्ञातावर हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, पीएसआय महेंद्र इंगळे, आशीष मोरखेडे, पंकज पवार यांनी गावात चौकशी सुरू केली.
हेही वाचा -सेवाग्राम आश्रमात मौन पाळून गांधींच्या प्रतिमेला गोळ्या घालण्याच्या कृत्याचा निषेध
श्रावण पंधराम हा नजर काढून देणे, फूक पाणी देण्यासाठी ओळखला जायचा. त्याच्या शेजारी मारेकरी रमेश पाखरे हा राहत होता. वर्षभरापूर्वी त्याचा मोठा मुलगा अनिकेत मरण पावला. त्याचा मृत्यू पंधराम याने करणी केल्याने झाला. तसेच रमेशचा लहान मुलगा हाही आजारी असल्याने आता श्रावण पंधराम यानेच जादुटोणा केला असल्याचा राग त्याच्या मनात होता.
यासाठी त्याने श्रावणला संपविण्याचा कट रचला. यासाठी नाचागाव येथील साळभाऊ ईश्वर पिंजरकर, अंकुश उर्फ मोण्या शेंडे, तसेच एक अल्पवयीन अशा तिघांना सोबत घेऊन रमेश पाखरे याने तिघांना ५ हजार रुपये देऊ करत हत्या केली.
कोणी कोणावर जादू करू शकत नाही-
जादुटोणा अशा प्रकारचा कोणताही प्रकार नसतो. ही घटना अस्वस्थ करणारी आहे. अंगात देवी येणे, मांत्रिक बाबा लोक गावातील लोकांचे नाव सांगतात यातून अशा घटना घडतात. यावर विश्वास ठेऊ नये. '२५ लाख घ्या आणि जादूटोणा करून दाखवा' हे आमचे आव्हान अजूनही कोणी स्वीकारले नाही. त्यामुळे आशा गोष्टींवर विश्वास ठेवून कोणी कोणाच्या जीवावर उठू नका, असे मत अनिसच्या युवा शाखेचे राज्य संघटक पंकज वंजारे यांनी 'ईनाडू इंडिया'ला दिली.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES