• A
  • A
  • A
वर्ध्यात सुरक्षा सप्ताहाचे उद्धघाटन; शाळकरी विद्यार्थ्यांची पथनाट्यातून जनजागृती

वर्धा - शहरातील विकास भवन येथे सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राळेगाव येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले. वाहन चालवताना नियमांचे पालन आणि काळजी घेऊन 'गती आवरा जीवन सावरा' हा संदेश दिला.


कार्यक्रमाला मंचावर उद्घाटक नगराध्यक्ष अतुल तराळे, प्रभारी पोलीस अधिक्षक दिनेश कोल्हे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, सहायक परिवहन अधिकारी तिरनकार, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव मंचावर उपस्थित होते.
हेही वाचा - अडीच हजार पणत्यांनी उजळले 'संत केजाजी माऊली' मंदिर प्रवेशद्वार
यावेळी नागपूर येथील जन आक्रोश संघटना नागपूर यांनी विद्यार्थ्यांना नियमांची माहिती दिली. तसेच अनेक अपघातांचे झालेले चित्रीकरण दाखवत वाहन चालवताना केलेली घाई कशी जीवावर बेतते हे प्रत्यक्ष दाखवत मार्गदर्शन केले. पथनाट्य सादर करत त्यांनी चहाने हळू चालवा, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, हेल्मेटने कशा प्रकारे जीव वाचतो हे नाटकातून सादर करत शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

खरेतर याच वयात कॉलेजचे तरुण युवा मंडळी भरधाव वाहन चालवून जीव गमावतात. यात जीव जरी एकट्याचा जात असला तरी त्यामागे अनेकांना जिवंतपणी मरणासन्न आयुष्य जगायला भाग पडतात. भावनिक पद्धतीने घरी वाट कोणी तरी वाट पाहत आहे, असा संदेश त्यांनी दिला. १८ वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्यांना मुलांना वाहन चालवायला देऊन नका, असा संदेश सुद्धा या नाटकातून देण्यात आला.

हेही वाचा - सेवाग्राम आश्रमात मौन पाळून गांधींच्या प्रतिमेला गोळ्या घालण्याच्या कृत्याचा निषेध
कारवाई आणि मोहीम सप्ताह
सुरक्षा सप्ताह निमित्त जनजगृती करण्याचे काम विविध उपक्रमातून केले जाणार आहे. यात ड्रंक अँड ड्राईव्ह , रॅश ड्रायव्हिंग, मोबाईलवर बोलणे, ओव्हरलोड वाहन अशा २५० लोकांचे परवाने रद्द करण्यात आले. पुढेही अशीच कारवाई सुरू राहणार आहे. तसेच ड्राईव्ह टेस्ट, रिफ्लेक्टर लावणे, १८ वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्यांना वाहन चालविण्यपासून रोखणे आदी कारवाई बद्दल सप्ताहात जनजगृती आणि कारवाई असे दुहेरी काम या निमित्ताने चालणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरक्षण दत्तात्रय गुरवं यांनी ईनाडू इंडियाला दिली.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES