• A
  • A
  • A
सेवाग्राम आश्रमात मौन पाळून गांधींच्या प्रतिमेला गोळ्या घालण्याच्या कृत्याचा निषेध

वर्धा - काँग्रेसचे विविध राज्यातील ४० पेक्षा जास्त प्रतिनिधी सेवाग्राम आश्रम परिसरातील शांती भवन येथे शिबिराच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी त्यांनी हिंदू महासभेच्या कृत्याचा निषेध केला. यावेळी बापू कुटीसमोर प्रार्थना करत मौन पाळण्यात आले. तसेच हे कृत्य करणारे एक दिवस गांधीजींच्या विचाराने चालतील, अशी आशाही व्यक्त केली.


यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव तौफिक मुल्लानी म्हणाले, की सरकार परदेशात जाऊन गांधींचे नाव घेते. चरखा चालवून गांधीजींप्रती आपले प्रेम दाखवते. मग असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही? सरकार हे भ्याड कृत्य सहन करत आहे. असे कृत्य पुन्हा होऊ नये म्हणून गंभीर पाऊले का उचलत नाही, असाही सवाल यावेळी करण्यात आला. तसेच सरकारने गांधीजींचे विचार जपले पाहिजेत. केवळ बोलून चालणार नाही, असेही सुनावण्यात आले.
हेही वाचा-राळेगणसिद्धी: कृषी मूल्य आयोगाच्या स्वायत्त संस्थेच्या दर्जावरून चर्चा रखडली
देशभरातून आलेले प्रतिनिधी यावेळी प्रार्थनेत सहभागी झाले होते. गांधीजींच्या प्रतिमेला गोळ्या घालून हिंदू महासभा गांधीजींचे विचार संपवू शकत नाही. एक माराल, तर हजारो लाखोंच्या संख्येने गांधीजींचे विचार मानणारे जन्मला येतील. हिंदू संस्कृतीत गेलेल्या व्यक्तीबद्दल चांगले बोलले जाते. मात्र, विकृत कृत्य करणाऱया हिंदू महासभेबद्दल कुठलीही द्वेष भावना न ठेवता त्यांना सद्बुद्धी मिळो, अशी प्रार्थना करण्यात आली.
हेही वाचा- शिवसेनेच्या डिजिटल प्रचाराची धुरा प्रशांत किशोरांच्या हाती?

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES