• A
  • A
  • A
अडीच हजार पणत्यांनी उजळले 'संत केजाजी माऊली' मंदिर प्रवेशद्वार

वर्धा- वर्ध्यातील सेलू घोराड संत केजाजी आणि त्यांचे पुत्र नामदेव महाराजांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त घोराड नगरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी पारायण समाप्ती आणि संत केकाजी महाराज यांच्या ११२ व्या पुण्यतिथीनिमित्त मंदिरात तब्बल अडीच हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. महिलांनी हे दिवे लावून 'संत केजाजी महाराज माऊली प्रसन्न' हे नाव साकारण्यात आले.

हेही वाचा - वर्ध्यातील जिनिंगला भीषण आग लागल्याने कापूस जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान
पिता पुत्र संत असणारी घोराड नगरी विदर्भातील प्रतिपंढरी म्हणून ओळखली जाते. ११२ वर्षाची परंपरा असलेला हा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो. केजाजी महाराजांच्या मंदिरात या सप्ताह निमित्त परायणाचे आयोजन केले जाते. संपूर्ण गावसह मंदिराला विद्युत रोषणाई केली जाते. विठ्ठल रुक्मीणी मंदिराच्या सभा मंडपात हा डोळे दिपावणारा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. संत केजाजी माऊली प्रसन्न या जयघोषाने दुमदुमली. या निमित्ताने मंगळवारी शंकरजीच्या मंदिर परिसरात रिंगण सोहळा रंगतो.
हेही वाचा - वर्ध्यात कायमस्वरूपी घरपट्ट्याच्या मागणीसाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES