• A
  • A
  • A
वर्ध्यातील जिनिंगला भीषण आग लागल्याने कापूस जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान

वर्धा - हिंगणघाट तालुक्यातील जाम रोडवरील आजंती येथील पद्मावती इंडस्ट्रीजच्या जिनिंगला सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत तब्बल ३ फलाटावर ठेवलेला कापसाच्या गंजीला वेढा घातल्याने आगीचे लोण आणि धूर दूरपर्यंत दिसून येत होते. अग्निशामक दलाच्या साह्याने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीत कोट्यवधींचा कापूस जळून खाक झाला आहे.


पद्मावती जिनिंगचे कपूर कोचर आणि संदीप कोचर हे संचालक आहे. त्यांच्याकडून मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी केल्याची नोंद असून हा कापूस ६ हजार चौरस फूट जागी ठेवण्यात आला होता. सोमवारी एका वाहनातून कापूस खाली केल्या जात असताना अचानक आग लागली. काही क्षणातच आगीचा वेढा सर्वत्र पसरला. यावेळी सुरुवातील फलाटावर काम करत असलेल्या महिला आणि पुरुष कामगारांना बाहेर काढण्यात आले. पण आग एवढी भीषण होती की कापूस जळून राख झाला.

यावेळी अग्निशामक तसेच जिनिंगमधील आग विझवण्याच्या नियोजित यंत्रणेच्या साह्याने तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मागील ९ वर्षांपासून कार्यरत असलेल्या या जिनिंगमध्ये पाहिल्यांदाच आग लागली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. आगीची माहिती मिळताच हिंगणघाट एपीएमसीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, सरपंच सीमा देवढे तसेच ग्रामसेवक, पटवारी आणि पोलिसांनी जाऊन पाहणी केली आहे. नुकसानीचा आकडा कळू शकला नसला तरी कोटींच्या घरात नुकसान असल्याचे प्राथमिक अंदाजावरून सांगितले जात आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES